मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

घारापुरी(एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा भगवा फडकला.शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध.  शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व  विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.!

घारापुरी(एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा भगवा फडकला.शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.!


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात अठरा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, गेले चार दिवस उरण तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायत निवडणूकी साठी सरपंच व सदस्य साठी शिवसेना व्यतिरिक्त कोणीही अर्ज सादर न केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा भगवा झेंडा घारापुरी ग्रामपंचायत  फडकला आहे. यामध्ये सरपंच पदी मिना मुकेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य पदी  बळीराम पदमाकर ठाकूर,हेमाली रुपेश म्हात्रे, अरुणा कमलाकर घरत, भरत शंकर पाटील नीता दिनेश ठाकूर, भारती प्रमोद पांचाळ, सचिन मुकुंद लाड हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.सर्व  विजयी शिलेदारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर  यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विजयाचे शिल्पकार माजी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच व शाखाप्रमुख  सचिन म्हात्रे नवनिर्वाचित सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच एक चांगली विजयी सुरुवात करून दिल्याबद्दल सर्वानी धन्यवाद दिले आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुखश्री नरेश राहळकर, माजी सभापती  विश्वास म्हात्रे, उरण शहरप्रमुख महेंद्र पाटील,उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील, उपविभागप्रमुख रवी पाटील, घारापुरीचे उपसरपंच व शाखाप्रमुख  सचिन म्हात्रे, नवीन शेवा शाखाप्रमुख  शैलेश भोईर, घारापुरीचे कार्यकर्ते विजय पांचाळ,श्रीधर घरत,संदीप पाटील,अशोक पाटील,मुकेश भोईर,सोमेश्वर भोईर,समीर भोईर,रुपेश म्हात्रे,लवेश भोईर,मंगेश आवटे, रोशन ठाकूर,महिला आघाडी नमिता घरत,रुपाली म्हात्रे,पल्लवी भोईर, कविता भोईर व शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "घारापुरी(एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा भगवा फडकला.शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...