म्हसळा शहरात रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीचे रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष!
म्हसळा प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील दिघी येथील सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठे बंदर अर्थात दिघी पोर्ट (अदानी पोर्ट) च्या कामांना गती प्राप्त होत असतानाच गेल्या ४-५ वर्षांपासून माणगाव - दिघी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कंत्राट जे. एम.म्हात्रे इन्फ्रा लि.या कंपनीने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी अगदीच शर्थीचे प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येते.मात्र सदर रस्त्याचे काम करताना कंपनीचे अभियंते आपापल्या माप नुसार काम करीत आहेत.यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तरी त्यांच्याशी कंपनी आणि कंपनीचे अभियंते यांना काही देणंघेणं नाही.अस दिसून येत.
मात्र सद्या नव्याने तयार झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामामध्ये रस्ते अपघात होत आहेत आणि पुढे अपघात सुद्धा होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळते.कारण कंपनीने वाहन धारकांना रस्ते अपघातापासून वाचण्यासाठी काही उपाय योजना केलेली दिसून येत नाही.उलट अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक सुद्धा लावायला कंपनीचे अभियंते आणि अधिकारी विसरत असल्याचे दिसून येते.तसेच म्हसळा शहरा शेजारून जाणाऱ्या बायपास मुळे म्हसळा पेट्रोल पंप आणि न्यू इंग्लिश स्कूल शाळा या दोन्ही ठिकाणी चौक निर्माण झाले असून या दोन्ही ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारे दिशा दर्शक तसेच रस्ता दुभाजक(divider) नसल्याने अनेक वेळा वाहनधारकांना वळण घ्यायला मिळत नसल्याने मोठी गडबडताना दिसतात. त्यामुळे म्हसळा पेट्रोल पंप येथे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.
तसेच न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे सुद्धा म्हसळा कडून श्रीवर्धन कडे जाणारा तसेच नव्याने तयार करण्यात आलेला बायपास हा न्यू इंग्लिश स्कूल शेजारी जोडला जायचं मात्र बायपास आणि म्हसळा असे दोन वेग वेगळे रस्ते होते.मात्र सद्या हा रस्ता दुरुस्त करताना म्हसळा साठी स्वतंत्र असणारा असलेला रस्ता बंद करून बायपास ला जोडून शाळेजवळून जात असताना बायपास ने येणारी भरधाव वाहने तसेच म्हसळा कडून श्रीवर्धन कडे जाणारी स्थानिक वाहने यांच्या मध्ये चुकून टक्कर लागून मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.तसेच शाळा जवळ असल्याने नेहमीच लहान मुलांची या ठिकाणी वर्दळ दिसून येते.
तरी या दोन्ही अतिमहत्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत जे. एम.म्हात्रे कंपनी ची उदासीनता दिसून येते.मात्र कंपनी सोबतच नगर पंचायत म्हसळा,सार्वजनिक बांधकाम विभाग म्हसळा आणि इतर शासकीय प्रशासकीय अधिकारी हे सुध्दा कुठे तरी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते.तरी हे शासकीय अधिकारी तसेच कंपनीचे अधिकारी कोणता अपघात होण्याची वाट बघत आहेत का?असा सवाल सर्वसामान्य म्हसळा वासिय विचारीत असल्याचे आढलून येते.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
0 Response to "म्हसळा शहरात रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीचे रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष!"
टिप्पणी पोस्ट करा