
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, धनंजय मुंडेंसोबतचा ‘तो’ व्हिडीओ समोर...
महाराष्ट्र : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष
देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या
प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष
देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. वाल्मिक
कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून याप्रकरणी सातत्याने धनंजय मुंडेंवर
आरोप होताना दिसत आहेत. सध्या वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी
सुरु आहे. याप्रकरणी सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता वाल्मिक
कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाल्मिक कराडने ऊस तोडणी यंत्र मालकांना फसवल्याचा धक्कादायक
प्रकार समोर आला आहे. वाल्मिक कराडने ऊस तोडणी यंत्र मालकांना अनुदान देतो म्हणून
सांगितले. मात्र अद्याप ते अनुदान दिले नाही. वाल्मिक कराडने १४० शेतकऱ्यांना
फसवल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडने कृषीमंत्री जवळचे आहेत म्हणून अनुदान मिळवून
देतो, असे अमिष शेतकऱ्यांना दिले होते. मात्र अद्याप ते दिलेले नाही.
तसेच अनुदान मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोपही
त्याच्यावर करण्यात आला आहे.
0 Response to "वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, धनंजय मुंडेंसोबतचा ‘तो’ व्हिडीओ समोर... "
टिप्पणी पोस्ट करा