मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?

राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?


महाराष्ट्र,मुंबई  :
राज्यात महायुतीचे  सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य मनसे  प्रमुख राज ठाकरे यांनी 'माझा व्हिजन' कार्यक्रमात केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कोणता दबाव आहे?  ईडी, सीबीआयचा दबाव आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात 50 जागा देखील येत नाहीत. कारण मनसेच्या मदतीने सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांचा व्हायला पाहिजे. या गमतीजमती असतात.  गेल्या 25 वर्षांपासून आपण हे राजकारणातील विनोद पाहत आहोत, असे त्यांनी म्हटले.

ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा अमित शाह यांना मदत करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा अपमान करणे. गेल्या काही काळापासून मोदी-शाह-फडणवीस ज्या पद्धतीचे राजकारण करत आहेत, ते मराठी माणसाच्या हिताचे नाही. तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगताय की फडणवीसांना आपण मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे?  ईडी, सीबीआयचा दबाव आहे का? की आणखीन कशाचा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकारणात प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे. अनेक वर्ष ते निवडणुका लढत आहेत. निवडणुकीत काय फळ मिळतंय हे आपण पाहत आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

अमित ठाकरे आमच्याच परिवारातील मुलगा

अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी ही धडपड वाटते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतो. मुलगाही आमचाच आहे. तो आमच्या परिवारातील मुलगा आहे. त्यावर आम्ही फार भाष्य करणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकेकाळी राज ठाकरे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे म्हणत होते. आता एका महिन्यात नेमकं काय झालं? की महाराष्ट्राचे शत्रू महाराष्ट्राचे तारणहार असल्यासारखे वाटू लागले. जे लोकं महाराष्ट्रावर चाल करून येतात त्यांच्यासोबत ते जात आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

 

0 Response to "राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...