मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्र आणि झारखंडबाबत आपचा मोठा निर्णय, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी?

महाराष्ट्र आणि झारखंडबाबत आपचा मोठा निर्णय, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी?


महाराष्ट्र: 
आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता.

हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. फाटाफुटीचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

0 Response to "महाराष्ट्र आणि झारखंडबाबत आपचा मोठा निर्णय, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...