मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध दुर्दशा, 34 वर 6 विकेट्स, चौघे आले तसेच गेले, रोहित-विराट फ्लॉप...

टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध दुर्दशा, 34 वर 6 विकेट्स, चौघे आले तसेच गेले, रोहित-विराट फ्लॉप...


टीम इंडियाची न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या डावात दुर्दशा झाली आहे.टीम इंडियाने पहिल्या सत्रात 6 विकेट्स गमावल्या आहेत. त्यापैकी चौघांना भोपळाही फोडता आलेला नाही.

टीम इंडियाच्या फलंदाजांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाची न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दुर्दशा झाली आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्याच सत्रात 6 झटके देत पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. इतकंच नाही तर टीम इंडियाच्या 6 पैकी चौघांना भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजाच्या रुपात भारताने 34 धावा असताना सहावी विकेट गमावली आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला. त्यामुळे आता टीम इंडिया 100 धावांच्या आतच ऑलआऊट होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

0 Response to "टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध दुर्दशा, 34 वर 6 विकेट्स, चौघे आले तसेच गेले, रोहित-विराट फ्लॉप... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...