मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बारामतीतून नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून लढण्यासाठी अजित पवार इच्छुक होते; दादांनी स्वत: केला खुलासा...

बारामतीतून नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून लढण्यासाठी अजित पवार इच्छुक होते; दादांनी स्वत: केला खुलासा...


महाराष्ट्र,पुणे : 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला सभा झाली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार बारामती नव्हे तर 'या' मतदारसंघातून लढणार होते. वाचा सविस्तर बातमी...

राज्याच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती विधानसभा मतदारसंघाचीया मतदारसंघात पहिल्यांच अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळतेय. या मतदारसंघात काय होणार? याकडे राज्याचं लक्ष आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. आपण बारामतीतून लढणारच नव्हतो, असं अजित पवार म्हणालेत. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला अजित पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. बारामतीत यंदा उभं राहणारच नव्हतो. मी शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलो होतोय तशी चाचपणी करायला लावली होती, असा खुलासाच खुद्द अजित पवारांनी केलाय.

अजित पवारांचा मोठा खुलासा

बारामतीतून उभं रहाणार नव्हतो. शिरुर- हवेलीतून उभं राहण्यासाठी नादवलेलो. शिरुर, पुरंदर, सिन्नर विधानसभा मतदार संघातून संधी होती. असा खुलासाही अजित पवारांनी शिरुरमधील सभेतून केला. आता तुम्ही माझी करु नकाय बारामतीकर पाहून घेतील असं म्हणत बारामतीची परिस्थिती सुधारलीय, असंही अजित पवार म्हणाले.

महायुतीचं सरकार आणायचं आहे- अजित पवार

वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे. महायुती सर्व जण आता प्रचार करत आहे. तगडे उमेदवार देण्याचा पर्यंत केला आहे. पुढच्या वेळी मतदारसंघाची फेर रचना होणार आहे. महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी केलं आहे. मागच्या निवडणुकीत झालेले त्रुटी आम्ही सुधारतोय. कारण त्यावेळेस एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. त्याची किंमत महायुतीला मोजावी लागली. आपल्याला पुन्हा महायुतीचा सरकार राज्यामध्ये आणायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

0 Response to "बारामतीतून नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून लढण्यासाठी अजित पवार इच्छुक होते; दादांनी स्वत: केला खुलासा... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...