मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जय शाह यांनी गावातील तरुणाची विकेट काढावी…उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना थेट आव्हान...

जय शाह यांनी गावातील तरुणाची विकेट काढावी…उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना थेट आव्हान...

महाराष्ट्र :
 जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावातील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहीत नाही. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडला नाही? मग त्यांना अध्यक्ष का केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरु केला आहे. आपल्या प्रचारातून उद्धव ठाकरे राज्यातील महायुती सरकारला लक्ष करत आहे. त्याचवेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ले करत आहेत. आता त्यांनी अमित शाह यांच्या मुलगा जय शाह यांच्यावर हल्ला केला. जय शाह यांना कोणत्या निकषावर बीसीसीआयचे अध्यक्षपद दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

महिलांना तीन हजार रुपये देणार

आमचे सरकार आल्यावर महिलांना दीड हजार नाही तर तीन हजार रुपये देणार आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल. आम्ही फक्त मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले होते. आता पुन्हा कर्जमुक्त केले असते. परंतु त्यांनी आमचे सरकार पाडले. महायुती ठेकेदारांचे पोट भरत आहे. तो विकास आम्हाला नको आहे.

जय शाह यांच्यावर हल्ला

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मागील वेळेस म्हटले होते कीआदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. परंतु मी अमित शाह यांना विचारतो, जय शाह यांना क्रिकेटमधील काय माहीत आहे. मी आव्हान देतो, जय शहा यांनी गावातील तरुणांची विकेट काढून दाखवावी, मग त्यांना बीसीसीआय नाही तर कुठेही अध्यक्ष करा, माझा विरोध असणार नाही.

जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावातील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहीत नाही. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडला नाही? मग त्यांना अध्यक्ष का केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

0 Response to "जय शाह यांनी गावातील तरुणाची विकेट काढावी…उद्धव ठाकरे यांचे अमित शाह यांना थेट आव्हान... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...