मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘तीन नद्या जोडण्याला मंजुरी, यामुळे या भागात पाण्याची समस्या मिटणार’, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती...

‘तीन नद्या जोडण्याला मंजुरी, यामुळे या भागात पाण्याची समस्या मिटणार’, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती...


महाराष्ट्र :  
"काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केलं? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहीले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेले, आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला. महायुतीच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सिंचनासह योजनांना गती मिळाली" असं पीएम मोदी म्हणाले.

अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा आधार आहे. पण कापूस शेतकऱ्याला अनेक दशकं या शेतीचा लाभ मिळाला नाही. ही परिस्थिती बदलतेय. कापूस शेतकऱ्यांच उत्पादन वाढवण्यासाठी उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर दोघांना प्रोत्साहन दिलं जातयअसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अकोला येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. मी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केलीय. या टेक्सटाईल पार्कमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नवीन संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याची जननी काँग्रेस आहेअसा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महाराष्ट्रात इतकी वर्ष काँग्रेसच सरकार होतं. विदर्भात पाणी संकट वाढत गेलं. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केलं? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहीले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेले, आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला. महायुतीच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सिंचनासह योजनांना गती मिळालीअसं पीएम मोदी म्हणाले.

आमचा संकल्प आहे, की…’

वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा या नद्या जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा येथील पाण्याची समस्या दूर होईल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च आहेअसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पूर आणि दुष्काळ या समस्या संपवण्यासाठी आमच्या सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राच्या या भागात पाण्याची समस्या दूर होईल. उत्पादन सुधारेल. आम्ही शेतकऱ्यांना कमी पाणी वापरण्याच आवाहन करुन सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहोत. आमचा संकल्प आहे, शेतकऱ्यांनी इतकं सशक्त झालं पाहिजे की, ते देशाच्या प्रगतीचे नायक बनले पाहिजेतअसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. खर्च कमी करुन उत्पादन वाढवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहेअसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

0 Response to "‘तीन नद्या जोडण्याला मंजुरी, यामुळे या भागात पाण्याची समस्या मिटणार’, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...